रस्त्यानी चाललो होतो तर पाय अडखळला
वाकून पहिले तर एक दिवा सापडला
खूप खराब होता म्हणून थोडासा घसला..
खण्कन आवाज आणि एक राक्षस निघाला!
चल म्हणे तुला स्वर्ग दाखवतो..
नाही म्हणायला मी काही लहान नव्हतो
म्हणले चल, जरा फुकटात मजा मारतो
प्रोग्रामर असून सुद्धा जमले नाही अमेरिकेला जायला
स्वर्ग तरी पाहून येतो, जरा शांती मिळेल जिवाला
ढग विरले, डोंगर सरले, संपले पाया खलचे आकाश
जमिनीला पाय लागताच आठवण झाली, सत्यनाश्!
अरे वेड्या म्हणले थोडा वेळ तर द्यायचा
मॅनेजर ला फोन केला असता तर पगार तरी मिळाला असता
तो पण एन्जॉय करू द्यायचा!
गेली तेव्हड्यात समोरून एक सुंदर परी
श्रावणाच्या सरी, डोळ्यात हिरवीगार दरी
काय झाले? .. राक्षस म्हणाला
..
..
मेंदू मधले किडे पण फार वळवळ करतात
जुन्या वही मधल्या पिकत चाललेल्या पाना कडे बघत सगळे मिळून ओरडत रहातात!
परत मी त्यांना गोळा करतो आणि मेंदू मधे नीट झोपवतो
अर्ध्या ग्लासाकडे बघत असतो, आणि तो संपला तर वेटर परत येऊन अर्धाच भरतो
मित्रा मला फार भूक लागली आहे
इतक्या लांब प्रवास करून शु पण लागली आहे
आपण आधी थोडे खोऊन घेऊ का?
आणि सगळ्यात आधी, मी इथेच रस्त्याच्या कडेला उभे राहून मोकळे होऊ का?
नको नको.. देव बघत असतो!! राक्षस म्हणाला
आयला कमालच आहे..
हा जर खरच स्वर्ग आहे, तर देव इथे काय करतो?
इथले झाले.. आता आमच्याकडे यावे असे त्याला कधीच वाटत नाही का?
आई वडील माझे अजुन महिन्याचा हिशोब लिहून पॉलिसी काढत आहेत.
मला त्यांची आठवण येत नाही, पण ते रोज माझी वाट बघत आहेत
फार मारले नाही त्यांनी मला लहानपणी..
लहान पण संपल्यापासून मला वाटायचे स्वर्गात जावे..
तरुण्याने भरलेले शरीर घेऊन लहान मुला सारखे पारदर्शी आनंदाने जगावे
जितका दूर जातोय तितका परत खेचला जातोय
हिरवी गार शेते दिसतात आधून मधून, पण थांबायला वेळ नाही म्हणून पुढे निघून जातोय
खदखदा हसून पचकन तिथे थुन्क्ला तो कंडक्टर
माझ्याकडे बघून हसला, सुट्टे पैसे मागायला लाजलो तर
काय करणार तसा मी मनानि मोठा होतो, पण काल पासून जेवण केले नव्हते आणि उरलेल्या सुट्ट्यांचा बस थांबल्यावर वडा खाणार होतो
इथे तरी तसे नसावे.
माझ्या आठवणींचे गठोडे ह्या स्वर्गात जुने होऊन विरून जावे
स्वर्गा मधे अपार्टमेंट आहे आता माझे
इथल्या कुणालाच वाटत नाही मी इथे राहायला लायक आहे म्हणून
पण कालच प्रॉजेक्ट मॅनेजर नि सांगितले माझा प्रॉजेक्ट एक्सटेंड झाला म्हणून
निळे रत्न डोळ्यात बसवलेली एक बाहुली राहते माझ्या शेजारी आता. त्यामुळे दिवस एकदम मजेत जातो.
कालच मला काचेचा डोंगर दाखवायला घेऊन गेली होती. एकदम लहान पणि स्वप्नात पहिला होता तसा.
गाडी तिने मलाच चालवायला सांगितली. तिला पेट्रोल खर्च करायचे नव्हते बहुतेक.
.....घरा मधे एकटा असतांना कधी तरी अंधारात एक निळा पिवळा अजगर दिसतो मला हिंडतांना
पण मी त्याच्या कडे दुर्लक्ष करतो.
गाठोडे सांडले त्या दिवशी पळुन गेला एकदम.
..
फोन चे बिल कमी येतय आणि गाठोडे पण संपत चाललाय
एकदा जाउन यावेच घरी.
गाठोडे भरून येतो आणि अंधारात फेकुनच मारतो
..
..
फक्त एकदा तो दिवा परत सापडला पाहिजे
2 comments:
Hi,
तुमची माझ्या ब्लॉग वरची comment वाचली ... धन्यवाद Ranjya !
तुम्ही फाफेची पुस्तके कुठे मिळतात विचारले आहे . तुम्ही कुठे राहता ??
पुण्यात राहत असाल तर पुण्यात कोणत्याही चांगल्या पुस्तकाच्या दुकानात मिळतील.
उत्कर्ष प्रकाशनाने २० पुस्तकांचा संपूर्ण संच पुनः प्रकाशित केलाय. त्यामुळे माझ्या मते तो कोणत्याही शहरातील प्रमुख पुस्तकालयात मिळणे अवघड नाही.
या शिवाय दर रविवारी 'सकाळ'च्या बालमित्र पुरवणी मध्ये फाफेच्या गोष्टी कॉमिक्स स्वरुपात येतात त्या तुम्ही वाचू शकता ....
(टीप : माझ्या ब्लॉगच्या comment मध्ये किंवा तुमच्या blogger profile मध्ये तुमच्या mail ID विषयी काही माहिती न मिळाल्यामुळे इथे reply देत आहे त्या बद्दल क्षमस्व)
[url=http://www.realcazinoz.com]casino[/url], also known as operative casinos or Internet casinos, are online versions of ancestral ("buddy and mortar") casinos. Online casinos own gamblers to make and wager on casino games duration the Internet.
Online casinos typically put on the bazaar odds and payback percentages that are comparable to land-based casinos. Some online casinos contend higher payback percentages during rift written concurrence games, and some bruit round payout concord audits on their websites. Assuming that the online casino is using an fittingly programmed indefinitely clump generator, eatables games like blackjack clothed an established tradition edge. The payout take a allocation as a replacement pro these games are established at coming the rules of the game.
Uncountable online casinos sublease or be actualized their software from companies like Microgaming, Realtime Gaming, Playtech, Worldwide Imposture Technology and CryptoLogic Inc.
Post a Comment